संतश्री सिदाजीआप्पा जयंतीनिमित्त आज विविध उपक्रम
नंदुरबार (प्रतिनिधी) आज शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संतश्री सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील गवळी समाजातर्फे विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करीत साध्या पद्धतीने उपक्रम होईल. महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नंदुरबार शाखेतर्फे शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बालवीर चौक येथे साध्या पद्धतीने प्रतिमापूजन करण्यात येईल. परमपूज्य संतश्री सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन आणि आरती महाप्रसाद वाटप करण्यात येईल.या उपक्रमास समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे व सचिव अशोक यादबोले तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.