द काश्मीर फाईल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा ; राजेंद्रसिंह राजपूत यांची मागणी
तळोदा (दिपक गोसावी) द काश्मीर फाईल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा या बाबतची मागणी नंदूरबार जिल्हा भाजपचे सरचिटणीस राजेंद्रसिंह राजपूत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे वास्तविक चित्रण अवघ्या देशापुढे मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाला राज्यात करमुक करावे. ज्यामुळे जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यांनी मानवतेला काळिमा फासणारे अत्याचार केलेत.त्याचे खरे चित्रीकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून पाहता लोकांना पाहता येईल.आणि ह्या सत्य परिस्थितीला सर्व स्तरातून जाणून घेतले जाईल. ह्याच उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तरी या वास्तविकतेचे दर्शन प्रत्येक स्तरातील लोकांना व्हावे तसेच हिंदू बांधवांवर झालेला अत्याचार ती सत्य परिस्थिती लोकांसमोर यावी म्हणून महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी राज्यातील आघाडी सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा. अशी मागणी राजेंद्रसिंह राजपूत यांनी ईमेल च्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.