महाराष्ट्र
नंदिनी नदीतील जलप्रदूषण थांबवा !
नाशिक (मनोज साठे) नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी नंदिनी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. उंटवाडी समोरील नदीकिनारी सर्रासपणे कचरा फेकला जात आहे. त्यामूळे नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त होऊन घाणीचे सम्राज्य पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एकीकडे याच नदीच्या एका बाजूला सुशोभीकरण व गॅबेलियन वॉल बांधण्याचं काम सुरू आहे तर इथे मात्र नदीची दुरावस्था झालेली पहावयास मिळते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर स्मार्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नंदिन नदीवर सुद्धा प्रशासनाचे लक्ष जाऊन ती सुद्धा स्मार्ट व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी बोलुन दाखवली.