आदीवासी महादेव कोळी जमातीचा चाळीसगाव तहसीलवर मोर्चा
चाळीसगाव (प्रतिनिधी) जामदे तालुका चाळीसगाव आदिवासी महादेव कोळी जमातीचा मोहन सोनवणे या मुलाच्या च्या शेताला लागून वाळू माफियांचा रस्ता आहे. त्यांना आदीवासी शेतकरी पुत्राने त्यांना अडवले व सांगितले की माझ्या शेतातील पिकाचे नुकसान होत आहे असे सांगताच वाळू माफियांनी सर्वांनी जमुन त्या मुलाला इतकं मारलं की त्याला नऊ दहा टाके पडले. त्या मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये एफ आर दाखल केली. त्या वाळू माफियांना अजूनपर्यंत अटक झालेली नाही रात्री दिवस वाळू चोरणे चालू आहे, या अन्यायविरोधात आदीवासी महादेव कोळी जमातीच्या जामदा गावातील अन्यायग्रस्त महीलांनी, वाल्या सेनाच्या युवकांनी आदीवासी कोळी जमातीच्या रणरागिणी गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली तहसील आँफिस चाळीसगाव, मेहूणबारे पोलीस स्टेशन येथे धडक मोर्चा काढून आदीवासी महादेव कोळी शेतकरीवर हल्ला करणा-या वाळू माफियांवर अद्याप कारवाई का केली नाही म्हणुन अधिका-यांना जाब विचारला.