म्हैसवाडी येथील आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील येथील म्हैसवाडी येथील एका व्यक्तीने आजाराला कंटाळून पाडळसा शिवारातील कोरड्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष राजाराम कोळी (वय 48) रा.म्हैसवाडी ता.यावल असे झालेल्या व्यक्तींचे नाव आहे फैजपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष कोळी हे म्हैसवाडी येथे आई वडीला पत्नी चार मुली व एक मुलास राहात होते त्यांना काही दिवसापासून दुर्धर आजार जडलेला होता त्यांच्यावर उपचार सुरू पण होता दरम्यान या आजाराला कंटाळून सोमवारी 14 मार्च पहाटे तीन वाजेच्या सुमारास घरातील कोणाला न काही सांगता ते निघून गेले. सकाळी कुटुंबांनी व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोधाशोध केला असता यावल तालुक्यातील पाडळसा शिवारातील जीवन बोरसे यांच्या शेतातील विहिरीत दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच सपोनि सिद्धेश्वर अटघेगावकर किरण चाटे महेश वंजारी यांची घटनास्थळी धाव घेऊन मृत्यू देह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला व नंतर चुलत भाऊ लिलाधर तायडे (कोळी) यांच्या कादंबरी वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक महेश वंजारी करीत आहे.