अंकलेश्वर, बऱ्हाणपूर रस्त्यावर अपघात ; एकाला जबर दुखापत
तळोदा (दिपक गोसावी) बुधावली गावाजवळ अंकलेश्वर ,बऱ्हाणपूर रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाने अप्पर, डिप्पर फोकस मारल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने रोडवरील खड्ड्यामुळे सदर वाहन रोडचे डावे बाजूस जोराने झाडाला आदळल्याने शिवराम जोलू पाडवी (वय ४७ रा. सोमावल हल्ली मुक्काम विक्रमनगर ,ता.तळोदा) जिल्हा नंदुरबार यांना जबर दुखापत झाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम जोलू पाडवी हे रात्री १०.३० च्या सुमारास आपल्या मारुती सूझुकी एस प्रेसो एम.एच.३९ ए. बी.६२९५ तळोद्याकडे येत असतांना समोरून येणाऱ्या वाहनाने अप्पर,डिप्पर फोकस मारल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने खड्डयांमुळे वाहन रोड च्या डाव्या बाजूस जोराने झाडाला आदळल्याने शिवराम जोलु पाडवी यांना जबर दुखापत झाली आहे. व गाडीचे नुकसान झाले आहे. त्यात इंजिन, बॅटरी,बोनट, समोरील काच,हेडलाईट फुटून व दाबून नुकसान झाले आहे. याबाबत शिवराम जोलु पाडवी यांनी तळोदा पोलीस स्टेशनला खबर दिली असून अज्ञात वाहन मोटार वाहन रजि. नं.०२/२०२२नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.