लग्नाचे आमिष दाखवून तोतया नवरी व एजंटने केले अडीच लाख लंपास
चाळीसगाव (प्रतिनिधी) लग्न जमवून देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून, तोतया नववधू आणि एजंटने यूवकाकडून २ लाख ४० हजार लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील डामरुण येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास करून तोतया नवरी सह एजंटला अटक केली.
तालुक्यातील डामरुग्ण येथील घनश्याम मुरलीधर पाटील (वय २८) या युवकाच्या घरी २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान संशयित आशा संतोष शिंदे (वय ३१ रा. सुंदरवाडी, जैन शाळे जवळ चिकलठाणा, ता.जि. औरंगाबाद) व किरण भास्कर पाटील ऊर्फ बापु पाटील (वय ४५ रा. आमडदे ता. भडगाव) हे वेळेवेळी आले. त्यांनी घनश्याम याचा विश्वास संपादन केला. दोघांनी घनश्याम कडून २ लाख रुपये रोख व ४० हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज घेतला.
त्यानंतर तोतया नववधू आशा शिंदे पैसे व दागिने घेऊन पसार झाली होती. त्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास करत तोतया नववधूसह एजंटला अटक केली आहे .