यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि समिती यांचा अनागोंदी कारभार
जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्याचे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे कारण असे की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका अंतर्गत असलेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी मागील महिन्यात न्यूक्लियर बजेट योजने अंतर्गत MS-CIT आणि Typing करिता अर्ज मागविले गेले होते. त्यासंदर्भात लाभार्थी यादी जाहीर झाले आहे. परंतु जे खरे लाभार्थी असायला हवे होते त्यांना डावलून प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि समिती यांनी त्यांचे मनमानी कारभार करत लाभार्थी यादी प्रदर्शित केली गेली आहे. आणि बाकी लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे.
त्यासंदर्भात तालुक्यातील लोकांमध्ये चर्चेला उधान आले आहे की योजना कशी राबवली गेली आहे? त्याला कोणत्या प्रकारे लाभार्थी निवड केले गेले आहे? यांचे विचार ना करण्यास विद्यार्थी गेले असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देत हा समितीचा निर्णय आहे असे सांगण्यात येत आहे आणि जे खरंच गरजू लाभार्थी आहेत त्यांना डावलले जात आहे अशी परिसरामधील लोकांमध्ये चर्चा रंगली आहे.