बिजासन घाटात केमिकलचा टकर उलटला ; चालक बचावला
चालकाचा ताबा सुटला ; दुभाजकाला धडकल्याने केमिकल रस्त्यावर
धुळे (स्वप्नील मराठे) भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टैंकर दुभाजकाला जाऊन धडकला. यात टँकर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उलटल्याने, टँकरमधील केमिकल पूर्णपणे वाहून गेले. हा अपघात मुंबई- आग्रा महामार्गावर १० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बिजासन घाटात महाराष्ट्र पोलीस चौकीजवळ घडला. या अपघात सुदैवाने चालक बचावला आहे. मध्यप्रदेशातील ठिकरी येथून केमिकलने भरलेला सी.जी. ०४५४३५ क्रमांकाचा टँकर औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला होता.
अपघातानंतर टँकरची झालेली अवस्था,
असतांना चालक अरुणकुमार बिहारीलाल ठाकूर रा.गोडी जि.महूवा (उत्तरप्रदेश) याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर सरळ दुभाजकावर जाऊन आदळला. टँकर भरधाव वेगाने असल्यामुळे दुभाजकाला ठोकून विरुद्धदिशेला जाऊन रस्त्याच्या बाजूला उलटला.
या अपघातात टँकरचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. त्यामुळे गाडीतील केमिकल संपूर्णपणे रस्त्यावर वाहून गेले. या घटनेत चालक मात्र, थोडक्यात बचावला. या घटनेत केमिकल सांडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान आठ दिवसांपूर्वीच बिजासन घाटात कंटेनर केमिकलचा टँकर यांच्यात अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला होता.