आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप
देगलूर (मारोती हनेगावे) देगलुर बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते देगलूर तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील अनेक निराधार महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.
आमदारांनी निराधार,अपंग, वृद्ध, महिंला बाबत नेहमीच सहकाऱ्यांची भूमिका घेतलेली आहे. अनेक गावांमध्ये विकास निधी देऊन मतदार संघामध्ये विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील प्रत्येक खात्याच्या मंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील समस्या सांगुन निधी खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यावर देगलूर मतदारसंघातील सर्व मतदारांचे अपेक्षा हे वाढले असून. जनतेतून आमदार जितेश भाऊ च्या कार्यावर जनता समाधानी असल्याचे पहावयास मिळत आहे. स्वर्गीय वडिल रावसाहेब अंतापुरकरच्या निधनानंतर हताश होऊन न बसता जनतेला मायबाप समजून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न ते कसोशीने करीत आहेत.वडिलांनी मतदार संघाच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न, राज्याचे माजी मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना. आशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आमदार जितेशभाऊ अंतापुरकर पूर्ण करीत आहेत. त्याबद्दल जनता समाधान व्यक्त करीत आहे.