महाराष्ट्र
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !
धुळे (विक्की आहिरे) शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 23 फेब्रुवारी बुधवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.