बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी आणखी एका संशयित ताब्यात
धुळे (विक्की आहिरे) महापालिकेतील कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र वितरीत केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी महापालिकेचा सफाई कर्मचाऱ्यास भोईवाडा, मोगलाई साक्री रोड धुळे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली आहे. लस न देता कोविड लसीकरणाचे ऑनलाईन बनावट प्रमाणपत्र वितरीत केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात मनपाचे निलंबित आरोग्याधिकारी, नगरसेवकांसह आणखी काही जणांची नावे पोलिस तपासात समोर आली आहेत. या गुन्ह्यात मनपा आरोग्य अधिकाऱ्यांसह 8 जणांना यापूर्वी अटक झाली होती. सध्या ते जामिनावर आहेत. पोलिसांनी या प्रकरणात मनपा सफाई कर्मचाऱ्यास यास देखील मंगळवारी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील संशयितास बनावट लसीकरण प्रमाणपत्रासाठी ग्राहक उपलब्ध करुन देण्यास या सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पुढील तपास करीत आहे.