महाराष्ट्र
बोदवड येथे थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज जयंती साजरी
अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेने समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बोदवड (प्रतिनिधी) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंद पाटील यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरात स्वच्छतेचे संदेश देत हातात झाडू घेऊन जयंती साजरी करण्यात आली.

या ठिकाणी सईद बागवान. संजय गायकवाड, दिनेश माळी, भास्कर गुरचळ, शांताराम कोळी, गजानन खोडके, सुनील बोरसे, निलेश माळी, हर्षल बडगुजर, तानाजी पाटील, निलेश अग्रवाल, डॉक्टर वैष्णवी, अशोक तायडे, धनराज गंगातीरे, आनंदा वाघ, राजेश ललवाणी, प्रकाश बावस्कर, विनोद पाडर, शैलेश वराडे, सचिन उगले यांच्यासह पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



