गुन्हेगारीमहाराष्ट्र
डीवायएसपींची बनावट सही करणाऱ्याला अटक
धुळे (विक्की आहिरे) धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील झेरॉक्स मशीनसाठी दिलेल्या कंपनीच्या काम कर्मचाऱ्याने उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांची बनावट सही केली. या प्रकरणी एकास अटक झाली आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयात झेरॉक्स मशीन आहे. त्यांची दुरुस्ती व इतर कामांसाठी एच. टी. इन्फोटेक सिस्टिम या कंपनीला ठेका आहे. या कंपनीकडे दीपक रामदास पाटील (रा. सावरखेडा, ता. अमळनेर) हा कामाला होता. त्याने बिलाच्या मागे उपअधीक्षक कातकडे यांचा बनावट सही शिक्का मारला.