साक्री येथे महान पुरुषांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन ; विद्यार्थ्यीनींना दिले शिव चारित्र्य
साक्री (सतीश पेंढारकर) श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सामर्थशाली प्रागतिक राज्य उभे केले. बलाढ्य शत्रुंचे मनोधैर्य खची करणारे काम करतांना गनिमी काव्याचे तंत्र वापरून महाराजांनी राज सत्येचा वापर सार्वभौम स्वराज्य स्थापन करणाऱ्या महान पुरुषांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष यांनी साक्री शहरात कार्यक्रमाचे आयोजन करून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींना शिव चारित्र्य दिले. पुस्तक ग्रंथरुपी ठरणार असल्याने त्याची प्रेरणा घेऊन तरुण युवा पिडीने एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन साक्रीचे प्रभारी पोलीस निरीक्षक एल.एच.गायकवाड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन युवकांसाठी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना धुळे जिल्हा संघटनेने छत्रपती शिवरायांचे विचार युवकांच्या मनात रुजवावे यासाठी आजच्या दिनी पुस्तक वाटप केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुख्याध्यापक विद्यानंद पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी पोलीस निरीक्षक एल.एच.गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद बनसोडे, पोलीस संरक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्षा वंदना खैरनार, जिल्हा महिला अध्यक्षा जागृती पाटील,साक्री तालुका अध्यक्षा मयुरी बोरसे,संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जगदाळे, जिल्हा संपर्क प्रमुख जी.टी. मोहिते,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शरद चव्हाण,साक्री तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ, उमाकांत अहिरराव, ज्ञानेश्वर ढालवाले, ज्ञानेश्वर शिवदे, कारभारी अहिरे, रतन पाटील, संजय मोरे, शरद वाघ आदी उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी पोलिस निरीक्षक एल.एच गायकवाड हे युवकांना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श समाजासाठी घालून दिला. त्यांचा आदर्श युवा पिढीसमोर मांडणे फार महत्त्वाचे आहे. युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखर वंदन करायचे असेल तर एम.पी.एस. सी.आणि यू.पी.एस.सी या परीक्षांची तयारी करून देश सेवा केली पाहिजे.
यावेळी नेपाळ देशातील पोखरा येथे आयोजित सहावी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत नॅशनल स्पोर्ट एज्युकेशन फेडरेशन मार्फत २०० व ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत साक्री तालुक्यातील अजय लांडे व रोहन रामोळे यांनी सहभाग घेऊन त्यांनी सुवर्णपदक रौप्यपदक जिंकले.या दोन्ही तरुणांचा पोलिश हक्क संरक्षण संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. तर रोषणा बोरसे, वैभवी बोरसे,ज्योत्स्ना बोरसे, वैष्णवी बोरसे, तेजस्विनी शेवाळे, विजय लांडे, पंकज भोई, दीपक रामोळे, निखिल रामोळे यांसह अनेक महाविद्यालयीन तरुणांना संघटनेच्यावतीने पुस्तक व पेन भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.टी. मोहिते यांनी केले. सूत्रसंचलन बाळकृष्ण तोरवणे तर आभार शरद चव्हाण यांनी मानले.