जि.प. सभेत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव
धुळे (विक्की आहिरे) जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकामासाठी आलेला निधी मार्च पूर्वीच सभेत पशुसंवर्धन अधिकाऱ्याने निधी परत पाठवल्याने सर्वच सदस्यांनी स्थायी समितीच्या नाराजी व्यक्त केली. अधिकारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्यामुळे कृषी सभापती संग्राम पाटील यांनी मंचाचा त्याग करत सामान्य सदस्यांमध्ये बसून सभेला हजेरी लावली. अध्यक्षांनी देखील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ठराव करण्यात आला. कृषी सभापती संग्राम पाटील यांनी आक्षेप घेत सभागृहात खोटी माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे नुकसान केले आहे. मार्च पर्यंत प्रतिक्षा न करताच अधिकाऱ्यांनी निधी परत पाठविला आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकामासाठी आलेला निधी मार्च पूर्वीच पशुसंवर्धन अधिकाऱ्याने परत पाठवल्याने सर्वच सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत नाराजी व्यक्त केली. अधिकारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्यामुळे कृषी सभापती संग्राम पाटील यांनी मंचचा त्याग करत सामान्य सदस्यांमध्ये बसून सभेला हजेरी लावली. अध्यक्षांनीही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.