तहसीलदार संजय शिंदे ठरले ‘एम्प्लाई ऑफ द मंथ’
धुळे (करण ठाकरे) अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांची विभागीय स्तरावर ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ म्हणून निवड झाली आहे. जानेवारी महिन्यासाठी तहसीलदार संवर्गातून त्यांची निवड करण्यात आली आहे.
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम, गरुड ॲपमधील शंभर टक्के कार्यवाही, कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातलगास सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी मनपाशी समन्वय ठेवणे, ३४ लाख ३४ हजार रुपयांचा जमीन महसूल वसूल केला तसेच २२ लाख रुपयांचे गौणखनिज पकडले, शिबिराच्या माध्यमातून ४० आदिवासी व्यक्तींना शिधापत्रिका वाटप केल्या. शासनाच्या नियमाप्रमाणे दिव्यांगांना शिधापत्रिका देण्यासाठी मोहीम राबविली. विद्यार्थ्यांना वय व अधिवास प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिर घेऊन शंभर दाखल्यांचे वाटप, आदी कामांची दखल घेऊन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तहसिलदार संजय शिंदे यांनी कोरोना काळात स्थलांतरीत मजुरांच्या अन्न व निवाऱ्यासह प्रवासासाठी भरीव कार्य केले होते.