महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्ही.जे. एन.टी. विभागाचे प्रदेश प्रवक्तेपदी अडव्होकेट अरविंद गोसावी यांची निवड
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथे मागील ३८ वर्षांपासुन वकिली व्यवसाय करीत असलेले आणि विद्द्यार्थी दशेपासूनच काँग्रेस पक्षाचे काम एकनिष्ठपणे आणि निरपेक्ष भावनेने करीत असलेले अडव्होकेट अरविंद म. गोसावी ह्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ह्यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्ही जे एन टी विभागाचे प्रदेश अध्यक्ष मदन राठोड ह्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्ही जे एन टी विभागाचे प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती केली.
अडव्होकेट अरविंद गोसावी ह्यांनी यापूर्वी काँग्रेस चे तालुका सरचिटणीस तालुका अध्यक्ष म्हणुन प्रभावीपणे कार्य केलेले असून सातत्यपूर्ण दांडगा जनसंपर्क वकिलीच्या माध्यमातून करीत असलेली जनसेवा तसेच कोणत्याही प्रलोभन दडपणाला बळी न पडता केलेल्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेवून त्यांच्या केलेल्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून मिळालेले पद हे नव्या जोमाने जनसेवा करण्यासाठी प्राप्त झालेले बळ ताकद असल्याचे सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे.