शिरीष कुमार मंडळातर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व अर्पण करून इतिहासात अग्रणी ठरलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.
बालवीर चौक परिसरात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे सोमवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त जागृती भीमा गवळी या विद्यार्थिनीच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. जागृती गवळीने सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. अभिवादन प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, नितीन तावडे, अरविंद खेडकर, तसेच रीना सीताराम गवळी, हर्शिता बापु गवळी, यामिनी काशिनाथ गवळी, वंशिका बापू गवळी, ज्योती आनंदा गवळी, गायत्री संजय पाटील, गायत्री लक्ष्मण चौधरी, प्रणव काशिनाथ गवळी, तेजस घटी, वेदांत गवळी, आदित्य गवळी, राज गवळी, हितांशु गवळी, आदी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.