महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्रशाला सोयगांवचा निकाल 90%
सोयगाव : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा -2022 चा विद्यालयाचा एकूण निकाल 90% लागला. प्रथम क्रमांक विभागुन दोन विद्यार्थीनींना मिळाला आहे. दोघांना सारखेच गुण आहेत.
अमृता रोठे – 95.20%
वैष्णवी काळे – 95.20%
द्वितीय क्रमांक
हर्षल संतोष वराडे 91.80
तृतीय क्रमांक
सुजाता अस्वार – 91.20%
परीक्षेत बसलेले एकुण परीक्षार्थी- 130 , विषेश प्राविण्य मीळालेले – 36 , प्रथम श्रेणीतील – 44 , व्दितीय श्रेणीत- 29 ,पास श्रेणीत – 08 असा निकाल आहे. प्रशालेत एकुण उत्तीर्ण विद्यार्थी 117 व शाळेचा एकुण शेकडा निकाल…90.00 % आहे. सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक आनंदा इंगळे, शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष, उपाध्यक्ष, पर्यवेक्षक , सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.