गुन्हेगारी
रावेर तालुक्यात धक्कादायक बातमी ; विवाहितेच्या डोक्यात लाकडाचा वार करून हत्या
रावेर (प्रतिनिधी) ४६ वर्षीय विवाहितेचा लाकडी दांडा डोक्यात मारल्यान खून केल्याची धक्कादायक घटना रावेर शहरातील सप्तश्रृंगी नगरात आज दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे.
सुनिता संजय महाजन (वय-४६) असे मयत महिलेचे नाव असून मयत विवाहितेचा मुलगा हा दुपारी कामावरून जेवनासाठी घरी आला तेव्हा घराला कुलूप होते. कूलूप उघडून पाहिले असता आईचा खून झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाला शेजारच्या नागरीकांनी मोठी गर्दी केली. हा खून कोणी केला व का केला यासंदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाही. खून झाल्याची माहिती रावेर पोलीसांना मिळाली.