सिल्लोड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकातील नामफलकास पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, नगरसेवक शकुंतलाबाई बन्सोड, प्रशांत क्षीरसागर, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, नारायण फाळके, ज्ञानेश्वर कुदळ, फहिम पठाण, संतोष धाडगे, रवी रासने, मोतीराम राऊत, आरेफ पठाण, बबलु पठाण, देवराव भाग्यवंत, जगन्नाथ कुदळ, अशोक राऊत, मंजीतराव भाग्यवंत,राजेश्वर आरके, मनोहर आरके, योगेश कुदळ, प्रयागबाई बन्सोड, केसरबाई थाडगे, अल्काबाई बन्सोड, नारायण भाग्यवंत, बाळु जाधव, लक्ष्मण मैंद, पांडुरगं कुदळ आदींची उपस्थिती होती.