पिंपळगाव हरे येथे घराला आग लागल्यामुळे विधवा महिलेचा संसार उध्वस्त ; मधुकर काटे यांनी दिला मदतीचा हात
शिदाड ता. पाचोरा (प्रतिनिधी) पिंपळगाव हरे येथे घराला आग लागल्यामुळे विधवा महिलेचा संसार उध्वस्त झाला. ज्योतिबाई भोई यांना मदतीचा हात म्हणून जि.प.सदस्य मधुकर काटे यांच्याकडून भोई परिवारास अकरा हजाराची मदत देण्यात आली.
दि. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ज्योतिबाई अशोक भोई.संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ज्योतीबाई यांच्या घराला भीषण आग लागली. त्यात त्यांचा पूर्ण संसार उध्वस्त झाला असुन घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाला. आगीत घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली होती. ज्योतिबाई भोई यांना सहा मुली आहेत. त्या पैकी दोन मुली विवाहित आहे चार मुलींचे अजून लग्न बाकी आहे. आग लागली कळताच आजू बाजूच्या लोकांनी धाव घेऊन घराचे छताचे पत्र तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीचे प्रमाण जास्त असल्यामुळे गावकरी घरातील सामान वाचवू शकले नाही. जोतिबाई यांच्यावर आजच उपासमारीची वेळ आलीय. त्यांना आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अनेक दाते मदतीसाठी पुढे येत आहेत. तरी आज, त्यांना मदत म्हणून मधुकर काटे यांनी अकरा हजार रुपयांची मदत केली. याप्रसंगी ज्योती ताई व मुलीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अशीच मदत सर्वांनी मिळून करावी असे आव्हान करण्यात येत आहे.