महाराष्ट्रराजकीय

सिल्लोडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

सिल्लोड (विवेक महाजन) तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली सुविधा देण्याबरोबरच प्रशासकीय कामात अद्यावतपणा आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा उपयोग होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी इमारतीच्या भुमिपूजन व कोनाशिलाचे अनावरण प्रसंगी व्यक्त केला. सिल्लोड येथील मध्यवर्ती प्रशासकीय (नवीन तहसिल कार्यालय) ईमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते रविवारी (दि.2) रोजी संपन्न झाले. याप्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते.

यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक रउफ बागवान, सचिन पाखरे, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मराठे, कार्यकारी अभियंता येरेकर, सिल्लोड नगरपालिका मुख्याधिकारी सय्यद रफीक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना विविध विभागाचे कार्यालय एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे असेही पालकमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी ४३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला असून १६ महिन्यात या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ही इमारत एकूण २ हजार ५०० चौरस मिटर जागेत २ मजली इमारत आहे यामध्ये तहसिल कार्यालय, मोजणी कार्यालय, नोंदणी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय आदी कार्यालयाचा समावेश असणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे