थ्रेड नवाब व शिवसेना..!
अमरावती (महेंद्रसिंग पवार) मुंबई सिरीयल ब्लास्ट झाले त्यावेळेस नवाब मलिक व अबु आझमी हे दोघे समाजवादी पक्षात होते. महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यानी स्थापन केलेल्या समितीने मुंबई सिरीयल स्फोटाची सखोल चौकशी केली होती.
त्या समितीने खुलासा केला होता की समाजवादी पक्षाचे तत्कालीन नेते अबु आझमी व नवाब मलिक या दोघांचा टेरर फंडिंग मध्ये सहभाग होता. तसेच या दोघांनीच कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम याच्या प्राॅपर्टींची विल्हेवाट लावली होती व त्यातून भेटलेला पैसा मुंबई स्फोटासाठी वापरला गेला होता हे निष्पन्न झाले होते.
बाॅम्ब स्फोट प्रकरणात अबु आझमी टाडा कायद्याखाली 5 वर्षे तुरुंगात होता. नंतर आलेल्या कांग्रेस सरकारने टाडा कायदा रद्द केल्यानंतर तो बाहेर आला होता.
या प्रकरणातून वाचण्यासाठी नवाब मलिक शरद पवारांना शरण गेला व राष्ट्रवादीकाँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दहा वर्षे केंद्रात आघाडी सरकारमध्ये शरद पवारांचा वरचष्मा असल्याने व महाराष्ट्रात सुद्धा पवार समर्थित सरकार असल्याने नवाब मलिक वाचत राहिला.
केंद्रात भाजप सरकार आल्यापासून या प्रकरणाचा सरकार अभ्यास करत होत अस कळतय.न्यायालयात जे पुरावे ईडीने दाखल केलेत ते बघता नवाबचे वकील सुद्धा गप झालेत. ईडीने न्यायालयात जे पुरावे दाखल केलेत त्या स्पष्ट दिसतय की नवाब मलिकचे संबंध दाऊद इब्राहिम सोबतच त्याची बहीण हसीना पारकर सोबत सुद्धा होते.
मुंबई स्फोटात सगळ्यात जास्त नुकसानमराठी माणसाचे झाले होते. मराठी माणूस स्फोटात एकतर मृत्यू पावला किंवा त्याला अपंगत्व आले होते. शेकडो मराठी व्यक्तींचे व्यवसाय देशोधडीला लागले होते.
हा हल्ला महाराष्ट्राच्या अस्मितेवर होता. महाराष्ट्राचे ह्रदय असलेल्या मुंबईवर होता. पण दुर्दैवाने आज स्फोटातील आरोपी ज्याचा स्फोटात सहभाग, महाराष्ट्रात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या समितीने सिद्ध केला होता.
तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावावर मोठी झालेली शिवसेनाच त्या आरोपीची बाजू घेत आहे. मराठी माणूस शिवसेनेला कधीच माफ करणार नाही.