दोंडाईचा येथे ३१ डिसेंबरच्या पुर्वसंध्येला मुंबई-धुळे-शिरपुरच्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी उचकवला बनावट देशी-विदेशी दारूचा गोडाऊन
दीड लाखाचा मालासह आरोपी अटकेत, आणखी साथीदार असण्याची चिन्हे
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे ३१ डिसेंबरच्या पुर्वसंध्येला म्हणजे दिनांक २९ डिसेंबर रोजी मुबंई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक ऊषा वर्मा, नाशिक येथील विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ, धुळे अधीक्षक सिमा झावरे मँडम व शिरपुरचे प्र.निरीक्षक पी.एस.पाटील यांच्या भरारी पथकाने दोडाईचा गावात लक्ष्मी मंदिरजवळ शिवराय चौकात मालपुर रोड पाण्याचा टाकीजवळ पक्क्या घराची तपासणी केली असता त्यामध्ये बनावट (ड्युब्लीकेट-नकली) देशी विदेशी मद्य बनविण्याचे साहित्य, मद्यार्क व बनावट देशी तयार बाटल्या गोडाऊनमध्ये मिळून आल्या आहेत.
सदर दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. तसेच घटना स्थळावरुन आरोपी नामे महेंद्र संतोष पाटील वय-२७ रा.- डाबरी घरकुल,दोडाईचा यास अटक करण्यातआली.
सदर गुन्ह्यातील जप्तमुद्देमाल पुढीप्रमाणे
१)१२०९६०/- देशीदारु टांगो पंच १८० मि.ली.च्या(बनावट मद्याच्या) एकूण २०१६ सीलबंद बाटल्या प्रत्येकी कीमंत ६० प्रमाणे अं.की.रू.
२)१२५०० एक २५ लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक ड्रम पूर्ण विदेशी दारू तयार ब्लेंड ने भरलेला अं.की. रु.
३)१५००/-एक २५ लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक ड्रम पूर्ण स्पिरीट ने भरलेला अं.कि.रु.
४)११००/- ओ.सी.ब्लू व्हिस्की विदेशी दारूचे जिवंत बुचे प्रत्येक नग ५/- प्रमाणे अं. कि.रू.
५)६९०/- देशी दारू टगो पंच लेबल असलेल्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ३४५ रिकाम्या बाटल्या प्रती नग २/- रुपये प्रमाणे अं. कि. रु.
६)११००/- खाकी रंगाचे एकूण ११० पुठ्ठे अं. कि. रु.
७)५००/- एक लिटर क्षमतेची इसेन्स ने भरलेली प्लॅस्टिक बाटली अं. कि. रु.असा एकूण एक लाख अठोतीस हजार तीनशे पन्नास रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पी. एस.पाटील प्र. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क शिरपूर, आर. आर. धनवटे निरीक्षक रा उ शु धुळे, सचिन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दोंडाईचा पो.स्टे., व्ही. एम. पाटील दुय्यम निरीक्षक रा उ शु वि.भ. प.नाशिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनिल निकुंभे, जवान एस. एच.देवरे, के. एम. गोसावी, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र फुलपगारे, दारासिंग पावरा, गोकुळ शिंदे, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, कॉन्स्टेबल प्रविण धनगर, वाहन चालक व्ही. बी. नाहिदे, निलेश मोरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पी. एस.पाटील, दुय्यम निरीक्षक, शिरपूर हे करीत आहेत.