दोंडाईचा वकील बार संघाच्या अध्यक्षपदी अँड आर आय राजपूत यांची सर्वानुमते निवड
दोंडाईचा (प्रतिनिधी) श. प्र. शहरातील वकिल बार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात आली.
दोंडाईचा शहरातील वकिल बार संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात सर्वानुमते अँड आर. आय. राजपुत यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी जे.व्ही.तायडे व सचिव अँड डि.व्ही.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वकिल बार संघाच्या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची वकील संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड एकनाथ भावसार, मा. उपाध्यक्ष अँड प्रशांत पाटील, सचिव अँड रविंद्र मोरे, अँड नितीन आयचित, अँड ज्ञानेश्वर पाटील, अँड दिपक ठाकूर, अँड प्रमोद मराठे, अँड संजय माणिक, अँड मनिषकुमार शाह, अँड मनिष रुपचंदाणी, अँड रामकृष्ण धनगर, अँड अँड महेंद्र जाधव, अँड पंकज पाटोळे, अँड संतोष भोई, अँड अजिंक्य जाधव, अँड गणेश पाटील, अँड अशोक पाटील, अँड सचिन चौधरी, अँड तुशार ईशी, अँड अरूण माळी, अँड आशा मंन्सुरी, अँड मनीषा वाघ, यासह आदींनी कडून व उद्योपती सरकार साहेब रावल, माजी मंत्री आ. जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, नगर परिषद सभापती नगरसेवकांच्या तसेच सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन कौतुक केले जात आहे.