महाराष्ट्र
मुसळधार पावसाचा इशारा ; ७ मार्चपासून नाशिकसह राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार
सटाणा (संभाजी सावंत) महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा राज्य हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मागील काही काळात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. ऐन वेळी पीक कापणीच्या वेळी जिल्ह्यात व राज्यात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव येथे विजांचा कडकडाट होणार असल्याने हवामान खात्याकडून सांगण्यात आल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.



