आर्वीत ई – श्रमकार्ड नोंदणीला प्रतिसाद
आर्वी (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील आर्वी येथे ई- श्रम कार्ड नोंदणीला प्रतिसाद मिळाला असून एकूण २०० जणांनी नोंदणी केली. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौरव बागले, नंदकिशोर बागले यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य किशोर हालोर यांच्या हस्ते करण्यात आले.
पं.स. सदस्य जिभाऊ शेणगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरीश शेलार, अशोक घोरपडे, योगेश अकर, मदेव चौधरी, मनोज साळवे, गोरख बागले, गौरव दुसाने, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस पुष्करसिंह राठोड, निखिल ठाकरे, भैय्या सोनवणे, चिंतामण सूर्यवंशी, मुरलीधरघोरपडे, प्रकाश मोरे, समाधान हाल्लोर, कैलास पदमर, महेंद्र पाटील, योगेश – . बागले, सागर कोळी, विनोद सुसलादे आदी उपस्थित होते. या योजने अंतर्गत ने असंघटित कामगारांसाठी दोन लाख रूपये न किमतीचा मोफत दुर्घटना विमा तसेच केंद्र ने शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. यावेळी लहान शेतकरी, शेतमजूर, पशुपालन, बांधकाम, सेंट्रींग मजूर, सामान्य नागरिक, भाजीपाला विक्रेते, , चांभार, फळ विक्रेता, सुतार, वीट भट्टी व कामगार, स्थलांतरित मजूर, घर कामगार, न रिक्षाचालक, आशा कामगार, दूध उत्पादक, अंगणवाडी सेविका, टेलर काम, हॉटेल र व्यवसायिकांची नोंदणी करण्यात आली.