गुन्हेगारीमहाराष्ट्र
चालत्या ट्रकमध्ये हृदविकाराचा झटका आल्याने तरुण ट्रकचालकाचा मृत्यू
धुळे (विक्की अहिरे) तालुक्यातील लळींग शिवारात ट्रक चालकाला चालत्या ट्रक मध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्याने आपल्या संचालकाला ट्रकचे स्टेरिंग योग्य वेळी सोपविले व तो अत्यवस्थ स्थितीत गेला. यावेळी त्यास हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासल्यानंतर जाहीर केले.
पलायननडी गणेशन (वय २८) असे या चालकाचे नाव असून तो कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे. चालत्या ट्रकमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सहचालकाने योग्य वेळी ट्रक वर नियंत्रण मिळविले अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडली असती परंतु चालकानेही प्रसंगावधान पाहतासह चालकाला ट्रकचे नियंत्रण सोपविले.