महाराष्ट्र
शिंदखेडा येथील बी.के.नगरचे कै.विनायक पाटील यांच्या प्रथम स्मरणार्थ मोफत विमा काढण्याचा कार्यक्रम
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील बी.के.नगर मधील रहिवासी असलेले एस.टी.डेपोत चालक म्हणून सेवानिवृत्त कै.विनायक तोताराम पाटील यांच्या प्रथम स्मरणार्थ काॅलनी परिसरातील नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने दोन लाखापर्यंतचा विमा काढण्याचा गोरगरीब व गरजुसाठी मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदरील विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले आहे. सदर योजनेसाठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व सहकार्य अजय पानपाटील यांचे लाभणार आहे. तरी काॅलनी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.



