गुन्हेगारीमहाराष्ट्र
पैशाच्या वादावादीतून गुंडाचा मिरजेत खून : म्रुत इचलकरंजीतील
मिरज (वृत्तसंस्था) शहरातील प्रताप कॉलनीत गोळ्या, शेंगदाणे पॅकींग व्यवसायातून शिल्लक राहिलेल्या पैशातून वादावादी झाल्याने इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार योगेश हणमंत शिंदे (वय २८, मूळ इचलकरंजी, सध्या रा. मिरज) याचा दोघांनी लोखंडी सळीने गळ्यावर हल्ला करून तसेच गळा दाबून खून ( murder ) केला. ही घटना सोमवारी रात्री (दि. ३) घडली.
याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी काही तासातच सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) आणि प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, मिरज) दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांची एक दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.



