राजकमल चौकात खेळाडूंनी प्रतिकात्मक सरावासह केला केंद्र सरकारचा निषेध राज्य शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्याची मागणी
राजेश पडोळे : अमरावती
अमरावती : केंद्र सरकारच्या धोरणामुळे बंद झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याचं पाहिजे.या मागणीला घेऊन शनिवारी राजकमल चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समितीचे वतीने अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.एज्युकेशन इज मस्ट- बट हेल्थ इज फर्स्ट असा संदेश देत या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वानी यावेळी केन्द्र शासनाच्या क्रीडा धोरणाचे उदासीन भूमिकेचा निषेध फलक उंचावीत व घोषणाबाजी करीत निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला.यावेळी अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा विषय समिती व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे वतीने प्रतिकात्मक क्रीडा स्पर्धेचे फुटपाथवर आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यानी क्रीडा स्पर्धा गणवेश घालून व क्रीडा साहित्य सोबत आणून सहभाग नोंदवला होता.एकीकडे खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया या घोषवाक्याचा पुरस्कार केला जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या आढमूठ्या धोरणामुळे व स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आंतर शालेय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास थांबला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात अमरावती येथेच हे आंदोलन पहिल्यांदा करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके,माजी नगरसेवक-रतन डेंडूळे, भुषण बनसोड, लकी नंदा ,जितेंद्रसिंह ठाकूर,अशोक हजारे, सुनील रायटे, पप्पूसेठ खत्री, प्रमोद सांगोले, मनोज केवले,किशोर भुयार, वासुदेव वानखडे, क्रीडा शिक्षक-अजय आळशी, श्रीकृष्ण ठाकरे, डॉ. नितीन चवाळे,सुधीर सवाई, दिलीप नवरे, आकाश भोयर, अनिल विल्हेकर, संजय मालवीय, शिवदत्त ढवळे, संतोष अरोरा, संगीता येवतीकर, संतोष मिसाळ, विश्वास जाधव, विजय मानकर, किशोर भुयार, प्रा. डॉ. श्याम रघुवंशी, किशोर देशमुख, प्रा.डॉ. अजय बोण्डे, भोजराज काळे,दिलीप कडू,दत्तात्रय उर्फ अण्णा बागल,जयश्री मोरे, वर्षा कुरहेकर, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, आकाश वडणेरकर, सुयोग तायडे, छोटू खंडारे, सचिन दळवी, प्रवीण भोरे, श्रीकांत झंवर, आनंद मिश्रा, संजय मलणकर,प्रवीण मेश्राम, संदिप आवारे, मनीष बजाज,राजेश कोरडे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा,कर्नलसिंग राहल, शक्ती तिडके, अमोल देशमुख, रमेशराव मातकर, जयकुमार नागे, अमोल वानखडे, भैय्या पडोळे, राजेंद्र कुरहेकर,मनीष देशमुख,बाळासाहेब होले, संजय महाजन, नरेशकुमार चांदनकर, प्रमोद उलहे, अजय उर्फ राणा देशमुख, सुरेश चौधरी, जयकुमार नागे,बाळासाहेब भोंडे, अक्षय पळसकर, संदीप औसिकर, अभिषेक धुरजड, जुमम्मा हसन नंदावले, धनराज चौके,बंडू ढवळे, आशीष अमृते, भास्कर ढेवले,अक्षय बुरघाटे, शिवाजी चौधरी, छायाचित्रकार-महेंद्र किल्लेकर, बाळकृष्ण तूरखेडे, अमोल देशमुख, संजय बढे, सनाउल्ला खान ठेकेदार, अफसर बेग,अबरार सर,शफीउद्दीन, सत्तारभाई राराणी, फारुखभाई मंडपवाले, हफिजभाई, रफिक ठेकेदार, साडीकभाई आयडिया, नौशादभाई शालिमार, शेख रहेमान, सनाउल्ला सर, साबीर पहेलवान, अब्दुल जावेद, नावेद इक्बाल, अबरार मोहमद साबीर,सनिभाई,मतीनं टेलर, मुन्नाभाई फोटो स्टुडिओवाले, अब्दुल नईम चुडीवाले, नदिमामुल्ला सर,दिलबर शाह, युसूफ शाह,शेख जफर, वहिद शाह,बब्बू अंपायर, हबीबखा ठेकेदार, मोईन खान,अख्तर हुसेन आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समिती,तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ , पंचमुखी फुटबॉल अकेडमी चे सदस्य यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला होता.
– राज्य शासनाने खेळ व क्रीडा विद्यार्थी खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरीता वर्ग १० वी व १२वी च्या प्रविष्ट विद्यार्थी खेळाडुंना शालेय क्रीडा स्पर्धा सहभाग व प्राविण्या करीता अतिरीक्त क्रीडा गुण दिले जातात.करीता शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन होणे गरजेचे आहे.सोबतच वयोगट १९च्या खेळाडुंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धा प्राविण्या करीता महाराष्ट्र राज्य सेवा अंतर्गत ५%खेळाडु आरक्षणा पासुन वंचीत रहावे लागणार आहे.
प्रशांत डवरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अखिल देशपातळी वरती शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन कोणाच्या अधिपत्याखाली व कोणाच्या स्पर्धा नियमावली अंतर्गत करावयाचे याकरीता केंद्रीय क्रीडा मंञालयाने सर्व राज्यांना पञाद्वारा आदेश देणे गरजेचे आहे.जेणे करून सर्व राज्य आप-आपल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा मार्फत या सञात कमीत कमी तालुका/जिल्हा/विभागीय व राज्यस्तरा पर्यंत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यास शालेय विद्यार्थी वर्गांचे नुकसान होणार नाही.
प्रा . डॉ . नितीन चवाळे,सचिव,अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडा विषय समिती