नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रताप विद्या मंदिराच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी
चोपडा (विश्वास वाडे) नेहरू युवा केंद्र या केंद्रशासनाच्या संस्थेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये युवा खेळाडूंना मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये कबड्डी या खेळात तालुक्यातून तब्बल १९ संघांनी सहभाग नोंदविला यात प्रताप विद्या मंदिराच्या शिवबा क्रीडा संघाने प्रथम क्रमांक मिळविला तसेच हॉलीबॉल या खेळात हॉलीबॉल कोचिंग क्लब यांनी प्रथम तर प्रताप विद्या मंदिराच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला तसेच मुलींच्या सामन्यात देखील द्वितीय क्रमांक पटकावून भरीव कामगिरी केली.
100 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रताप विद्यामंदिरातील खेळाडू कु. हर्षाली लक्ष्मण पाटील हिने दुसरा क्रमांक मिळवला.विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या विद्यामंदिरातील या सर्व खेळाडूंचे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.शिंदे, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. सदर खेळाडूंना प्रताप विद्या मंदिराच्या क्रीडा विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील, विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक नरेंद्र एन.महाजन, तालुक्यातील क्रीडाप्रेमी समाधान माळी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.