कापसाने गाढली 12 हजारी, 14 हजारापर्यंत बाजार जाणार ; व्यापाऱ्यांचा अंदाज
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) वायदे बाजारात कापूस आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून कापसाने 12 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. भविष्यात तोच कापुस 14 हजारापर्यंत जाण्याचे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या घरात कापूस असताना मात्र पाच हजारापासून सुरवातीला भाव वाढतच गेले.
6000, 7000, 8000, 9000 शेवटपर्यंत दहा हजाराचा भाव मिळण्याचा अंदाज शेतकऱ्यांना होता. तेव्हा ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस काढला. भारतीय कापड उद्योग जगला पाहिजे म्हणून यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही असा सर्वत्र तज्ञांचा अंदाज असताना देखील शेतकऱ्यांच्या घरातुन कापूस गेला. तेव्हा कापसाने 12000 गाठली आहे आणि भविष्यात तो अजून वाढणार असून 14 हजाराचा टप्पा तो जवळपास गाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जेवढा नफा कापसाला शेतकऱ्याला मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक व्यापाऱ्यांच्या घशात उतरवत जात आहे. शासनाला शेतकऱ्यांची काळजी राहीली तर सुरुवातीलाच भाववाढीला चालणार दीली असती हा निव्वळ महागाई वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते करीत आहेत.