महाराष्ट्र
बोदवड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला पत्रकारांचा सन्मान
बोदवड (सतिष बाविस्कर) दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बोदवड येथे अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था जळगाव जिल्हाध्यक्ष संपर्क कार्यालय बोदवड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बोदवड तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार केला.
दैनिक लोकमत पत्रकार गोपाल व्यास, दैनिक सकाळ अमोल आमोदकर, दैनिक देशोन्नती अर्जुन असणे, दैनिक दिव्य मराठी संदीप बैरागी, दैनिक जळगाव व दैनिक बातमीदार सुरेश कोळी, थर्ड आय न्यूजचे सतीश बाविस्कर आदी समाविष्ट आहेत.
पत्रकार दिनानिमित्त सुनील बोरसे, नगरसेवक शिवसेना शांताराम कोळी, गोपाल पाटील, शिवसेना विभाग प्रमुख गजानन बोंडेकर, सचिन पाटील, मनोज पाटील, रुपेश भाऊ आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा पुष्पगुच्छ व पेढा भरवून सत्कार केला.