Summer Tips : जाणून घ्या उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपचार
मुंबई : उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले की कोणाचीही अवस्था दयनीय होऊ शकते. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे भारतात उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. याला सनस्ट्रोक असेही म्हणतात.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपचार
उष्णतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ लागतात, ते परत मिळवण्यासाठी नारळपाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहतेच पण त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात.
उष्माघात टाळण्यासाठी नेहमी कांद्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी कांद्याची पेस्ट तयार करून कपाळावर चोळा. कांद्याचा रस छातीवर, चेहऱ्यावर आणि कानाभोवती लावू शकता. कांद्याच्या विशेष गुणधर्मामुळे तापमान नियंत्रणात ठेवले जाते.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास, सूर्य आणि गरम वारा यांचा विपरीत परिणाम होतो. पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान व्यवस्थित राहते आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.
कैरीचे पन्हे उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाते. ते तयार करण्यासाठी आंबा गरम पाण्यात किंवा मंद आचेवर शिजवा. नंतर त्याचा गर मिक्सर ग्राइंडरमध्ये मीठ आणि आले सोबत एकत्र करून घ्या. पन्ह प्यायल्यानंतर उन्हात बाहेर गेल्यास उष्णता जाणवणार नाही.
दही आणि मीठापासून बनवलेले ताक उन्हाळ्यात टॉनिकपेक्षा कमी नाही. यामुळे शरीर थंड होते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.