पंजाब काँग्रेस सरकारचा शिरपूर भाजपाने केला निषेध
शिरपूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर व तालुकातर्फे येथील मार्केट कमेटी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मार्ल्यापण करुन साईबाबा मंदीरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले. येथेच निदर्शने आंदोलन करुन पंजाब सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिरपूर कृउबा समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मुकेश पाटील, अविनाश शिंपी, भालेराव माळी, राज सिसोदिया, प्रमोद भोंगे, बापु पाटील, योगेंद्रसिंग सिसोदिया, अनिल बोरसे, राजुलाल मारवाडी, जयसिंग राजपुत, सुर्यकांत पाटील आदि उपस्थित होते.