शिंदेंफळ येथील रस्ते व विकास कामांसाठी २ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न
सिल्लोड (विवेक महाजन) तालुक्यातील शिंदेंफळ येथे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जवळपास २ कोटी १३ लाख रुपयांच्या मंजूर विकास कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना – युवासेना शाखेचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शुक्रवार (दि.७) रोजी संपन्न झाले. यावेळी गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विकास कामे व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जालना शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, उपजिल्हाप्रमुख पंढरीराव भुतेकर, औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, पंचायत समिती सभापती डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीष ताठे, हरिदास दिवटे, नॅशनल सुतगीरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, युवासेनेचे शेख इम्रान ( गुड्डू ), प्रवीण मिरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शिंदेंफळ येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून शिंदेंफळ ते वडारवाडी रस्त्याचे काम करणे १ कोटी १२ लाख, तर शिंदेफळ फाटा ते शिंदेफळ गाव पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे 78 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासोबतच ग्रामविकास विभाग अंतर्गत लेखशीर्ष २५१५ अंतर्गत शिंदेफळ गावात मुस्लीम बांधवांसाठी शादिखाना बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे व गावांतर्गत पथदिवे बसविणे यासाठी २३ लाख अशा एकूण २ कोटी १३ लाख रुपयांच्या मंजूर विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. दरम्यान गावातील सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना प्रणित कानिफनाथ महाराज विकास पॅनल विजयी झाल्याने नवनिर्वाचित सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्यांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गावातील रानुबा शिंदे, दौलत अक्कलकर नारायण करडेल, रामसेट बखळे,बापू जाधव, पंढरी अक्कलकर, सुनील अक्कलकर, कैलास करडेल, रमेश वाघ, गोरख अक्कलकर, पुंडलिक शिंदे, रघुनाथ कावले, सागर पंडित, नामदेव शिंदे, रोहिदास दुतोंडे, अण्णा आम्ले, लक्ष्मण आम्ले, दादाराव इंगळे, रामदास करडेल , संतोष ढंगारे, नारायण अंबाडे, विठ्ठल खांदवे आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.



