स्वच्छ व हरित शहरासाठी नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानात सहभागी व्हावे : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन
सिल्लोड (विवेक महाजन) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २ जानेवारी रोजी शहरातील नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नवीन वर्षात पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी उपस्थितांना हरित शपथचे वाचन करून उपस्थितांना हरित शपथ दिली. यावेळी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच महसुल , ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात वृक्ष लागवड , घनकचरा व्यवस्थापन, अमृत शहरे, पर्यावरण वने, या माध्यमातून वायू, जल, नदी नाले स्वच्छ करणे इत्यादी बाबी माझी वसुंधरा या अभियानात असल्याने आपले शहर स्वच्छ शहर व हरित शहर करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी होवून सहकार्य करावे असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण नागरिकांना केले.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शासनाच्या प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. यापूर्वी अनेक उपक्रमात शहरातील नागरिक सहभागी झाले आणि विविध अभियान यशस्वी देखील करून दाखवले. माझी वसुंधरा अभियान देखील आपल्याला यशस्वी करणे आहे. माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरण शुद्ध होईल यातून पर्यावरणात ऑक्सिजनचा समतोल साधल्या जाणार असल्याने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. संजय जामकर, डॉ. मॅचिंद्र पाखरे, सुदर्शन अग्रवाल, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार,नगर परिषदेतील गटनेते नंदकिशोर सहारे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, दीपाली भवर, मेघा शाह, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, सुधाकर पाटील , बेग चांद मिर्झा, शंकरराव खांडवे, शेख सत्तार, रतनकुमार डोभाळ, आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर , जितु आरके, अनिस कुरेशी , शकुंतलाबाई बन्सोड, मोईन पठाण , शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण आदींची उपस्थिती होती. यांच्यासह मुख्याधिकारी सय्यद रफिक, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, न.प.तील प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, सुनील गोरडे, प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी, श्रीमती अलका सूर्यवंशी, सुनीता आरके, शेख अजीम, अनवर पठाण, गोरख धाडगे, दीपक दाभाडे , विलास तावडे आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.



