महाराष्ट्र
पोलीस चौकीतच जमवली दारूची मैफिल
नाशिक (मनोज साठे) नाशिक येथील गंगापूर रोड वरिल दादोजी कोंडदेवनगर मधील पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केली.
शिंदे नामक बंधू परिसरातील टवाळ खोरांची तक्रार द्यायला पोलीस चौकीत गेले होते. मात्र चौकी चे दार आतून बंद करुन पोलीस कर्मचारी दारू पार्टीत रंगले होते. याबद्दल शिंदे बंधूंनी जाब विचारला असता मद्यधुंद पोलिसांनी त्यांनाच मारहाण करायला सुरवात केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून बाहेरील नागरिक जमा झाल्यावर मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी जागेवरून पळ काढला. सदरील घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते. संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे