ना पंचनामा-ना आश्वासन, जागेवरच दिली राष्ट्रवादी पक्षाने नुकसानग्रस्त कुटूंबियांना मदत
एकूण बावीस कुटूंबियांना मिळाली तातडीची रोख मदत
दोंडाईचा (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यामध्ये नुकतेच काही दिवसापुर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने तालुक्यातील कुरुकवाडे, बाम्हणे, धमाणे,वरपाडे नेवाडे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेतीतील पिके जसे ज्वारी-मका-गहू-कापूस-हरभरा-पपई व घरांचे अतोनात जोरदार तडाखा देत नुकसान केले.त्यात वीजेचे खांब पडले. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले.यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे मा.मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख व माजी आमदार श्री रामकुष्ण पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त घटनास्थळी जात. शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता.ना पंचनामा-ना आश्वासन, जागेवरच रोख रकमेची शेतकऱ्यांना मदत करण्याचे संदीपदादा बेडसे यांनी ठरविले व शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचा यावेळी प्रयत्न केला. यामुळे परीसरातील शेतकरी सुखावला असल्याची भावना त्यांनी प्रथमतः व्यक्त केली.
यावेळी परिसरातील जवळपास बावीस शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रोख रूपयांची मदत करण्यात आली. मदत मिळालेल्यांची नावे खालीलप्रमाणे-गिरासे निर्मला दिलीप, गिरासे सुरेखा दिवाणसिंग, गिरासे संजय लोटन, गुरव कल्पना सुदाम, अहिरे रमेश सखाराम,भरत शांताराम पाटील,नयन बाबूलाल पवार,गुलाब करणसिंग भील, आत्माराम भिका अहिरे, मनोहर दंगल भील, सुभाष सुरेश भील,देवा गोरख भील ,संतोष भीमा भील, जतन सुका भील, रवींद्र मंगल भील, सोनवणे बुधा एका, अहिरे नंदलाल विठ्ठल , साहेबराव वामन भील, केशव संपत पाटील,बाबूलाल तानाजी पवार, शालिग्राम गंगाराम पाटील, नरेंद्र भटू पाटील आदी आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत कुरूकवाडे येथे माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी आमदार श्री रामकुष्ण पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, माजी उपसभापती शामकांत पाटील, कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानुदास पाटील, निलकंठ पाटील, आनंदराव पाटील, वकील पाटील, गिरधारीलाल रामराख्या, युवराज पाटील, राजेंद्र गिरासे, दिलीप पाटील, श्रीराम पाटील, कमलेश पाटील, उज्वल गोसावी, युवराज भील, शिवा भील, हेमंत जाधव, देविदास मोरे, ईश्वर पवार, दयासागर पाटील आदी उपस्थित होते.