चोपडा
भा.कि.संघाने चोपड्यात लाभकारी मुल्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन
चोपडा (विश्वास वाडे) भारतीय किसान संघाने केंद्र सरकारने लाभकारी मुल्य शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालास मिळावे म्हणून कायदा करण्याच्या मागणीसाठी आग्रह धरला आहे. त्याचाच भाग म्हणून संपूर्ण देशात भारतीय किसान संघाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.
महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय कृषी मंत्र्याना ही निवेदने पोहचविण्याची विनंती तहसीलदारांना करण्यात आली आहे. तहसीलदारांचे प्रतिनिधी हरपे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे, जिल्हा कार्यकारी सदस्य संजय बारेला, तालुकाध्यक्ष भगवान न्हायदे, मंत्री किरण बारी, माजी तालुकाध्यक्षा कविता वाणी आदी उपस्थित होते.