देशात कोरोनाचा कहर ! गेल्या २४ तासात १,९४,७२० नवे रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे १,९४,७२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या २४ तासात ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील २४ तासात देशात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १,९४,७२० एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर ११.०५ टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर १५.९ टक्के एवढा जास्त नोंदवला गेला. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ४८६८ एवढी झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.
सर्वाधिक मृत्यू कुठे?
मागील २४ तासात देशात १६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ४ लाख ८४ हजार ३७८ एवढी झाली आहे. कालच्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीतील असून दिल्लीतील २३ रुग्णांचा काल मृत्यू झाला तर महाराष्ट्रातही २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट आतापर्यंत ९६.०१% एवढा झाला आहे. मागील २४ तासात भारतात ६०,४०५ एवढे रुग्ण बरे झाले.
देशात आतापर्यंतची आकडेवारी
एकूण रुग्णसंख्या- ३,६०,७०,५१०
ओमिक्रॉनचे रुग्ण- ४,८६८
सक्रिय रुग्णसंख्या- ९,५५,३१९
एकूण बरे झालेले रुग्ण- ३,४६,३०,५३६
एकूण मृत्यू- ४,८४,६५५
एकूण लसीकरण – १,५३,८०,०८,२००