गुन्हेगारीराजकीय
धक्कादायक ! युवक कॉंग्रेस जिल्हाअध्यक्ष पंकज मोरेंच्या गाडीला अपघात ; काँग्रेसचे महासचिव यांचा मृत्यू
धारणी (योगेंद्र कास्डेकर) धारणी तालुक्याचे नव निर्वाचित युवक कॉंग्रेस जिल्हाअध्यक्ष पंकज मोरे यांचा गाडीला दर्यापुर येथे रात्री १ वाजता अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे महा सचिव रोहित देशमुख यांचा अपघाती मृत्यु झाल्याची माहिती बद्दल पंकज मोरे यानी बातमीला दुजोरा दिला आहे. अपघातात पंकज मोरे, परीक्षित जगताप, वैभव देशमुख, हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष यांना भेटल्यानंतर अकोला येथून अमरावती परती च्या प्रवासादरम्यान दर्यापुर अमरावती रोडवर हा अपघात झाला आहे.