महाराष्ट्र
चोपड्याच्या अनिलराज पाटील यांच्या चित्राची राष्ट्रीय चित्रप्रदर्शनासाठी निवड
चोपडा (विश्वास वाडे) येथील युवा कलावंत अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या ‘शंभू’ या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनासाठी झाली आहे. ३४ व्या ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर स्मृती चित्र प्रदर्शनासाठी या चित्राची निवड झाली आहे.
हे प्रदर्शन १ ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान टिळक स्मारक, पुणे येथे होणार आहे. रोटरींग इंक पेन या प्रकारातील हँडमेड पेपरवरील हे चित्र या प्रदर्शनात प्रदर्शित केले जाणार आहे. देशातील अनेक चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित होणार आहे. अनिलराज पाटील यांचे अभिनंदन होत आहे.