केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत डोलारखेडा फाटा ते धामणगांव फाटा रस्त्याचे खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुक्ताईनगर (सचिन झनके) कुऱ्हर (रुपेश महूरकर) भारत सरकार केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत रावेर-पातोंडी-पिंप्रीनांदू-नायगाव-डोलारखेडा-कुऱ्हा-वढोदा या रस्त्यावरील डोलारखेडा फाटा ते धामणगांव फाटा ह्या भागाचे आज खासदार रक्षाताई खडसे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सदर रस्ता मुक्ताईनगर तालुक्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाचा असुन, तालुक्यातील जवळ जवळ ७० टक्के गावे या भागात आहेत. सदर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली असुन, त्यामुळे दररोज या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली होती. खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून मंजूर केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी रु.१०.०० कोटी निधी मंजूर झालेले असुन, यावेळी कुऱ्हा परिसरातील नागरिकांनी यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांचे आभार मानले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या समवेत भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, प.स.सदस्य शुभांगीताई भोलाणे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भागवत राठोड, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, संतोष झनके, अल्पसंख्यांक अध्यक्ष असगर पठान, कुऱ्हा शहराध्यक्ष रवी राजपुत, तालुका उपाध्यक्ष मधुकर भोलाणकर, भाजयुमो सरचिटणीस मयूर महाजन, अंबादास बेलदार, राहुल मुळे, निवृत्ती खिरोडकर, प्रवीण भोंबे, सोपान झाल्टे, विशाल झाल्टे, विकास तायडे, प्रकाश कोंगळे, स्वप्निल न्हावकर, प्रवीण टेलर, देविदास दांडगे, चंद्रकांत बोराखेडे, ज्ञानेश्वर ढोले, निखिल भोलाणकर, तुषारसपकाळ, संजय नागल, गोपाळ कांडेलकर, संदिप कांडेलकर, मोरेश्वर महाजन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.