आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
शिष्यवृत्ती परीक्षेत मळदचे चौघे चमकले
दौंड (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. व त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांपैकी सायली शिंदे या विद्यार्थिनींने २४४ गुण मिळवून दौंड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
त्याच प्रमाणे प्रसाद जाधव २३४ गुण, ओम गलांडे २२० गुण, आयान सय्यद २१८ गुण याप्रमाणे मिळवले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम देविदास गलांडे यांनी केले आहे. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी नवनाथ वणवे, दिलीप वणवे शिवाजी गोरे शाळेचे मुख्याध्यापक शफिक मणियार शाळा व्यवस्थापन समितीने या चौघांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ही अभिनंदन केले आहे.