महाराष्ट्रराजकीय

धुळे मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ; लक्ष्मी नारायण मंदीर, मोबाईल टॉवर लगत असलेल्या पाईप लाईन लीक

धुळे (प्रतिनिधी) महापालिकेच्या ‘पाणी वाचवा’ या आवाहनाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. साक्री रोडवरील सिंचन भवन मागे असलेल्या लक्ष्मी नारायण मंदीर, मोबाईल टॉवर लगत असलेल्या पाईप लाईन लीक झाल्यामुळे हजारो लिटर पाणी अनेक महिन्यापासून वाया जात आहे. यामुळे आता धुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

काही महिन्यापूर्वी परिसरातील नगरसेविकेच्या सुपुत्राच्या उदात्त हेतूने लक्ष्मीनारायण मंदिराच्या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून येथून नळाचे कनेक्शन जोडले होते.परंतु परिसरातील रात्री-बेरात्री भटकत्या आत्म्यांनी ती नळजोडणीच भंगारासाठी तोडफोड केली. आणि नगरसेविका सुपुत्र आणि भाविक यांचे स्वप्न धुळीला मिळाले. आणि सेवाभावी काम थांबले. परंतु जेथून जोडणी केली तेथे मात्र लिक कायमस्वरुपी असल्याने पाणी येते त्या दिवशी गेल्या ४ महिन्यापासून बेहिशोबी पण हजारो लिटरच्या हिशोबाने पाणी वाया जात आहे. या वाहत्या पाण्यात वाहन चालक आपली लहान वहाने धुवून घेण्यात मश्गुल आहेत. आणि नळ जोडणीसाठी खोदलेला खड्डा त्यातच मोबाईल टॉवर वाल्यांनी प्रयोग करीत खोदून ठेवलेले खड्डे आणि अवजड वाहनांनी उद्धवस्त केलेला रस्ता यामुळे दुचाकी चालक व पायी चालणारे पादचारी जखमी होतांना आपण अशा परिसरात राहतो म्हणून स्वत:लाच शिवी हासडून आपली व्यथा मांडत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे