न.प.शिक्षण मंडळातील निवृत्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सुटल्याने मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार
मुख्याधिकाऱ्यांनी न. प .कडील 10 टक्के हिस्याची रक्कम दिल्याने सुटला प्रश्न
अमळनेर : येथील नगरपरिषद शिक्षण मंडळास नियमाप्रमाणे 10 टक्के हिस्यांची रक्कम पालिकेडून मिळण्यास विलंब होत असताना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उदार मनाने ही रक्कम देऊन निवृत्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सोडविल्याने सर्व सेवानिवृत्त वेतन धारक आणि कर्मचारी वृंदाच्या वतीने मुख्याधिकारी सरोदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्यांच्यासोबत नागरी हीत दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांचाही सत्कार करण्यात येऊन आमदार अनिल पाटील यांनी वेळोवेळी अनमोल सहकार्य केल्याने त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी हाजी कादर जनाब,सत्तार मास्तर,साहेबराव त्र्यंबक गुरुजी,हमीद अन्सारी,हमीद अमीर खाटीक,सावे गुरुजी,श्री राजपूत यांच्या हस्ते मान्यवरांना बुके शाल व अभिनंदन पत्र देण्यात आले,यावेळी लेखपाल सुनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जावेद अख्तर,श्री राजपूत,तर आभार रविंद्र पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न. प .शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.